AGS

Facebook pageInstagram pageYoutubeApplePlaystore

|

For any enquiry please fill up the form below, we will get back to you as soon as possible.

x

Send Us a Message

|

Abhimanyu Garbh Sanskar

अभिमन्यु गर्भ संस्कार - विशेषताए ध्येय एवं उद्देश ( Marathi ))

अभिमन्यु गर्भ संस्कार ;  वैशिष्ट्ये, ध्येय व उद्देश्य :

ध्येय व उद्देश :स्वस्थ, सुदृढ, सौभाग्यशाली, धनवान, विव्दान, निर्दोष, निर्भय, आनंदमय, दिर्घायु आणि दिव्य संतान प्राप्ती. पारिवारीक कलह व सामाजिक अप्रवृत्ती, चुकीच्या तत्वाच्या परिणामापासून शिशुस मुक्त ठेवणे व दिव्य पिढी घडवणे. कुटुंब, कूळ, धर्म, राष्ट्र व विश्‍वाच्या कल्याणाची भावना शिशूत जागृत करणे. भारतात प्रत्येक राज्यातील प्रमुखशहरात अभिमन्यू गर्भ संस्कार केंद्र स्थापित करणे. संपूर्ण भारतातच नव्हे तर गर्भसंस्कार विषयी संपूर्ण विश्‍वात जागृती करणे.

शिबीरा विषयीे :

गर्भ ध्यान, मंत्र ध्यान, प्राणायाम, सामान्य व्यायाम. मातृ संस्कार, पितृ संस्कार, धर्म संस्कार, षटचक्र संस्कार, मंत्र संस्कार, शिशू संवाद, गर्भवती अंतर्मनाची प्रार्थना, सामान्य प्रसुती, अनुवांशिक रोगांपासून शिशूस संरक्षण. दैनिक संरक्षण चक्र, मातृत्व उत्सव, श्रीकृष्ण ध्यान, शिशूस देव दर्शन, दिव्य शक्तींचे आवाहन, इ. साधना शिबिरात घेतल्या जातात.

प्रथम महिन्या पासून नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होईपर्यंत सर्व गर्भवतींसाठी समान उपयुक्त शिबीर. गर्भाधानापूर्वी सुध्दा संतान ईच्छुक महिलांसाठी उपयुक्त शिबीर.

गर्भवतींना आत्म निवेदन :

गर्भ संस्कार चा अर्थ सर्व प्रथम समजून घ्या . गर्भ संस्कार ते असतात जे बाळाच्या जगात आगमना नंतर सबंध आयुष्य भर सोबत राहतात. गर्भ संस्कार म्हणजे आईने गर्भस्थ बाळास जीवन जगण्याच्या कलेचे प्रशिक्षण होय, जे आईच्या अंतर्मनातून बाळाच्या अंतर्मनात स्थापित होतात, आणि तेच बाळाच्या जीवनात साकार होत असतात. बाळाचे स्वभाव, चित्त, बुध्दीमत्ता, आनंदमयतेचे प्रमाण, त्याचे सौभाग्य इ. गर्भातच निर्धारित होऊन जाजात. गर्भ संस्कार सुसंस्कार व कुसंस्कार दोन्ही स्वरुपात स्थापित होत असतात. हे गर्भस्थ बाळाच्या आईवर अवलंबून असते की नऊ महिण्याचा प्रवास ती कोणत्या प्रकारे निभावून जाते.

गर्भसंस्काराची प्रक्रिया ही वैद्यकीय प्रक्रिया नाही. यात डॉक्टर चे असणे महत्वपूर्ण नाही. डॉक्टरांचे काम केवळ गर्भवती व गर्भस्थ बाळाची काळजी घेणे व स्वस्थ प्रसुति होई पर्यंत आहे. गर्भ संस्कार तर एक मानसिक व अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ज्या व्दारे बाळाचे भावी जीवन निर्धारित केले जाते. अर्थात डॉक्टरांची भूमिका त्यांच्या जागी महत्वपूर्ण असतेच परंतू गर्भसंस्काराशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध कमी येतो. पण भारतात विशेषत: महाराष्ट्रात गर्भ संस्काराचा अर्थ केवळ आयुर्वेदाशी जोडला जातो. पण आयुर्वेद संबंधित गर्भ संस्काराची प्रकिया जरी वैद्यकिय दृष्टीकोणातून प्रशंसनिय असली तरीही त्याचा प्रत्यक्ष भाग स्वस्थ बाळ व स्वस्थ प्रसुति पर्यंत मर्यादित राहून जातो. या पुस्तकाच्या / सीडी च्या माध्यमातून किंवा शिबीराच्या माध्यमातून प्रत्यक्ष गर्भ संस्काराची प्रणाली व प्रशिक्षण दिले जात आहे. या द्वारेे स्वस्थ बाळ व स्वस्थ प्रसुति साठी तर लाभ होईलच पण या पलिकडे बाळाचे संपूर्ण आयुष्य निर्धारित करता येईल. शिबीरात वेळे अभावी घेतला जात नसलेला काही भाग व वाचून अवलंब करता येईल असा शिबीराचा काही भाग या पुस्तकात दिला असून हे पुस्तक गर्भवती साठी एक वरदान असल्या सारखे आहे. याची प्रचिती हे पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर आपणास येईलच. अभिमन्यू गर्भ संस्कार शिबिरात पोहंचण्याचे सौभाग्य सर्वांनाच लाभेल असे नाही, मात्र जे शिबीरात पोहंचू शकत नाही त्यांच्या साठी हे पुस्तक व सीडी चे 3 भाग अत्यंत महत्वाचे ठरतील. शिबीराचे प्रत्यक्ष अनुभव हे स्वप्नवत असल्यासारखे व अद्भुत परिणामकारक आहेत याची प्रचिती हजारो मातांनी आत्ता पर्यंत घेतलेली आहे.

नऊ महिन्यात काय खावे काय प्यावे, काणते औषध घ्यावे ? बाळाचा विकास कसा होतो ? प्रसुति कशी होते? चेकअप साठी कधी जावे ? आयुर्वेद चे उपचार काय असतात? योगासने कोणती करावीत? बाळ झाल्यानंतर बाळाचे संगोपण कसे करावे? कोणत्या लसी घ्याव्यात ? इत्यादि…..इ….या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटत असल्या तरी गर्भसंस्काराच्या अधिंकाश पुस्तकात हेच सर्व असते. परंतु गर्भसंस्काराशी अशा बाबींचा प्रत्यक्ष सबंध कमीच येतो. मुळात गर्भाधान झाल्यानंतर मूळ गर्भसंस्काराची प्रक्रिया सुरु होत असते जी प्रसुति पर्यंत प्रत्यक्ष पणे चालते. या पुस्तकात अनावश्यक गोष्टी टाळून केवळ गर्भ संस्कार विषयी साहित्य आपणास देत आहोत ज्या व्दारे गर्भसंस्काराची संपूर्ण मूळ प्रक्रिया आपणास प्राप्त होऊन जाईल.

गर्भाधानापुर्वीची तयारी ही सुध्दा फार महत्वाची असून पुस्तकाच्या शेवटच्या भागात याबद्दल बरीच माहिती दिली आहे, जी गर्भधारणा ईच्छुकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. उच्च स्तरीय आत्म्यास गर्भात आमंंत्रण देण्यासाठी व प्राकृतिक व स्वस्थ पणे गर्भ राहण्यासाठी हे महत्वाचे आहे. व पूर्व तयारीने संतान प्राप्ती संबंधित काही दोष किंवा अडचणी असतिल त्याचे सुध्दा निर्मुलन करता येते. शिबीर खास गर्भवतींसाठी आहेच परंतू गर्भधारणे पूर्र्वी सुध्दा शिबीर करता येईल. त्यामुळे गर्भधारणा सहजपणे होते व अडचणी असल्यास दूर होतात.

बाळ झाल्यानंतरची प्रक्रिया शिशू संगोपन व बाल संस्काराच्या अंतर्गत येते. या विषयावर स्वतंत्र पुस्तकाचे काम चालू आहे. पण या पुस्तकात केवळ मूळ गर्भसंस्काराचा विषय घेत आहोत.

बाळ गर्भात केवळ स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचे परिणाम नसून, येथे शरीरासोबत दोन आत्म्यांचे मिलन होते जे एक नविन आत्म्यास आमंत्रण देते. त्यानंतर शरीर यंत्रणा आपल्या सारखेच एक घर म्हणजे एक नविन शरीर त्या आत्म्या साठी बनविण्यास प्रारंभ करते . गर्भात केवळ शरीर निर्मिती होत नाही तर त्या गर्भात जाणता जीव असतो. व तो प्रत्येक संस्कार स्वीकारत असतो, पूर्वजन्माच्या गुणांसह नऊ महीन्यांपर्यंत आई वडिलांच्या गुणांना धारण करत असतो. एवढेच नाही तर गर्भात प्रवेश घेतांना हा आत्मा आपल्या गत जन्मातल्या पूर्व संस्कार व सिध्दांताच्या आधारावर आपले धर्म, आई -वडील व कुटुंबाची निवड करत असते.

जेंव्हा स्त्रीला पहिल्यांदा कळते की, ती गर्भवती आहे तो पर्यंत तीच्या गर्भात एक सजिव चेतना स्थापित झालेली असते. स्त्री आई झाल्या शिवाय पूर्ण होत नाही. तिच्या व्यक्तीमत्वाची चमक व पूर्ण सौंदर्य ती आई झाल्यानंतरच प्रकट होते. बाळ 9 महिन्यांपर्यंत आईच्या श्‍वासाने श्‍वास घेत असते. आईच्या हृदयाशी हृदय, रक्ताशी रक्त, जीवाशी जीव, बाळाचे स्वत:चे संपूर्ण अस्तित्वच जणु आईच्या असण्याने असते, त्यामुळे स्त्री आई झाल्याशिवाय कधीही तृप्त होत नाही. गर्भस्थ बाळाचे जीवन जणु आईच्या श्‍वासांनी व आशेवर चालत असते. बाळ आईच्या डोळ्यांनी जग पाहत असतो, आईच्या कानांनी ऐकत असतो, आईच्या विचारांनी विचार करत असतो, आईच्या भावनांमुळे त्याचे भाव असतात. आई किती वेळ बाळाकडे लक्ष देत असेल ?, परंतु बाळ प्रत्येक क्षण आईशी जुळलेले असते. पहिल्या दिवसा पासून प्रत्येक क्षण ते सचेतनेने गर्भसंस्कार स्वीकारत असते. आई होणे म्हणजे एक अध्यात्मिक प्राप्ती आहे, एक पूर्णत्व आहे मातृत्वाचे. आई होणे ब्रह्मांडातील सर्वोच्च सुख आहे, सर्वोच्च आनंदाचे प्रतिक आहे.

एक अशा बाळाला जन्म दिला जाऊ शकतो, कि तो संपूर्ण स्वस्थ, दिर्घायु व निर्दोष असेल, सदैव आनंदमय व दिव्य गुणांनी युक्त असेल. जो स्वत: सोबत आपल्या कुटुंबाचे – कुळाचे कल्याण करेल. राष्ट्र व विश्‍वाच्या प्रगती व शांती प्रक्रियेत हातभार लावेल. एक धर्मनिष्ठ व ईश्‍वरनिष्ठ असेल. कला, साहित्य, संगीत, ध्यान धारणा, प्रेम अशा अनेक गुणांनी तो युक्त होऊ शकेल. त्याची विद्वत्ता व बुध्दिमत्ता विलक्षण असेल. अत्यंत शांत, दृढ निश्‍चयी, प्रेमळ, सकारात्मक विचारांनी युक्त असेल. असं खूप कांही सांगता येईल अन या सर्व गुणांची स्थापना गर्भातच केली जाऊ शकते व या प्रक्रियेलाच आपण गर्भ संस्कार म्हणू शकतो.

जीवाची स्थापना एक अध्यात्मिक घटना व प्रसव एक नैसर्गिक घटना आहे. प्रसव झाल्या नंतर स्त्री च्या जीवनात खुप काही बदल घडून येतात. काल पर्यंत जी एक मुलगी असते ती आज आई बनते. पण या परिवर्तनाला समजून घेतल्यास या नविन जन्माचे साफल्य मिळते. आई व जन्मास येणार्‍या बाळाचे स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी व त्यात सुसंस्कार स्थापन करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे जरुरी आहे. गर्भावस्था हि स्त्री जीवनाची अशी अवस्था आहे, की ज्या मध्ये विशेष परिस्थिती आणि कधी कधी असुविधांचा सामना करावा लागतो. आई आणि बाळाचे स्वास्थ्य एकीकडे माता-पित्याची शारीरिक प्रकृती व मनोवैज्ञानिक स्थितीवर अवलंबून असते, तसेच राहणीमान, खानपान व इतर सवयींचा सरळ प्रभाव बाळावर पडतो. या काळात वेळ कसा निघून जाईल हे कळतच नाही.

जेंव्हा बाळाचे गर्भात आगमन होते तेंव्हा त्याच्या आईचे कर्तव्य आहे कि, त्याला सुसंस्कार द्यावे, त्यासाठी आईने नऊ महिने कसे जगावे याचा विचार व्हायला हवा. नऊ महिने जणु बाळासाठी तपस्याच होय. त्या तपातून जातांना त्यास एवढे सक्षम व्हायचे असते की, जन्मानंतर या जगाच्या रंगमंचावर आपली भूमिका यशस्वी रित्या पार पाडायची असते त्यात भावी माता पित्याची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते.

जर पूर्व नियोजन व सकारात्मक गर्भ संस्कार करुन भावी माता पित्यांनी संतान प्राप्ती केली तर कोणतीही शारीरिक व मानसिक उणिव त्या संतान मध्ये राहणार नाही. जागातील सर्वोत्तम संतान व सुख प्राप्तीसाठी गर्भसंस्कार व गर्भध्यान आवश्यक आहे. जसे आपल्या पिढीची सुदृढता आपल्या माता पित्याच्या सुदृढतेवर अवलंबून होती त्याचप्रमाणे येणारी पिढी आपल्यावर अवलंबून असते. गर्भधारणेपूर्वीच त्याची तयारी करावी आणि चुकून पूर्व तयारी केली नसेल तर कमीत कमी नऊ महिन्याच्या पर्यंत आई आणि बाळाचे तन-मन-आत्मा स्वस्थ व प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. नऊ महिण्याच्या आईच्या स्वभावावर त्या बाळाचे संपूर्ण आयुष्यातील स्वभाव निर्धारीत होत असते. केवळ शारीरिक स्वास्थ्याने बाळ सुदृढ तर होईल पण मानसिक व अध्यात्मिक स्वास्थाची काळजी घेतल्यास सयंमशील, सकारात्मक गुणांनी युक्त, संस्कृती प्रिय, सामाजिक मर्यादेची जाण असणारी, स्वधर्माचे स्वाभिमान राखणारी, अशी संतान प्राप्त होईल.

आई बरोबरच पित्याचे संवेदनाचे प्रभाव सुध्दा गर्भस्थ बाळावर पडतात कारण आईनंतर पिताच बाळाच्या अधिक निकट असतो. घराच्या इतर सदस्यांचे संवेदनांचे परिणाम, घरातील वातावरण या बाबींचाही गर्भस्थ बाळ काही प्रमाणात स्वीकारत असतोच परंतु या सगळ्यांचे माध्यम केवळ एकच आहे ती म्हणजे आई ! ती नऊ महिन्यांपर्यंत स्वत:ला कशा प्रकारे ठेवते ते बाळाच्या दृष्टिकोणातून महत्वाचे आहे.

विशेषत: अभिमन्यू गर्भ संस्कार च्या या संपूर्ण संकल्पने व्दारे आपणास स्वस्थ, सुदृढ, सौभाग्यशाली, धनवान, विद्वान, निर्दोष, आनंदमय, दिर्घायु, निर्भय व दिव्य संतान प्राप्ती होईल हे सुनिश्‍चित आहे. सर्व भावी मातापित्यांचे हार्दिक अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा !

सर्व मंगलम भवतु । शुभं भवतु ॥ जय श्री कृष्ण ।

- मनोज बुब

Related Articles

Abhimanyu Garbh Sanskar
अभिमन्यु गर्भ संस्कार - विशेषताए ध्येय एवं उद्देश ( Hindi )

अभिमन्यु गर्भ संस्कार - विशेषताए ध्येय एवं उद्देश ( Hindi ) गर्भ संस्कार का अर्थ क्य...

16-Dec-2022
Manoj Bub
Abhimanyu Garbh Sanskar
Abhimanyu Garbh Sanskar ( English )

Abhimanyu Garbh Sanskar Committed towards Healthy & Happy Motherhood. Invest your 2 ...

14-Jan-2023
Manoj Bub
Abhimanyu Garbh Sanskar
गर्भवतीने गर्भ संस्कार कार्यशाळेत सहभाग घेणे किंवा ऑनलाइन कोर्स करणे आवश्यक का आहे ?

"अभिमन्यु गर्भ संस्कार" च्या कार्यशाळेमध्ये सहभागी होणे हे न केवळ गर्भावस्थेदरम्यान स...

08-Feb-2024
Prajkta
Abhimanyu Garbh Sanskar
गर्भवती महिलाओं का गर्भ संस्कार कार्यशाला में भाग लेना या ऑनलाइन कोर्स करना क्यों आवश्यक है?

"अभिमन्यु गर्भ संस्कार" कार्यशाला या ऑनलाइन कोर्स गर्भवती महिलाओं और उनके जीवन साथी क...

08-Feb-2024
Prajkata
Abhimanyu Garbh Sanskar
08-Feb-2024
Prajakta