Blogs

अभिमन्यू गर्भ संस्कार - वैशिष्ट्ये, ध्येय व उद्देश्य

अभिमन्यू गर्भ संस्कार

वैशिष्ट्ये, ध्येय उद्देश्य (Marathi)

स्वस्थ, सुदृढ, सौभाग्यशाली, धनवान, विव्दान, निर्दोष, निर्भय, आनंदमय, दिर्घायु आणि दिव्य संतान प्राप्ती. पारिवारीक कलह व सामाजिक अप्रवृत्ती, चुकीच्या तत्वाच्या परिणामापासून शिशुस मुक्त ठेवणे व दिव्य पिढी घडवणे.

            कुटुंब, कूळ, धर्म, राष्ट्र व विश्‍वाच्या कल्याणाची भावना शिशूत जागृत करणे.

            भारतात प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरात अभिमन्यू गर्भ संस्कार केंद्र स्थापित करणे.

            संपूर्ण भारतातच नव्हे तर गर्भसंस्कार विषयी संपूर्ण विश्‍वात जागृती करणे.

            शिबीरात तसेच बाजारात आमचे अत्यंत उपयुक्त असे अभिमन्यू गर्भ संस्कार पुस्तक, अभिमन्यू गर्भ संस्कार 3 भागात सीडी, ब्रम्हांड मानस रहस्य हे पुस्तक, इ. साहित्य उपलब्ध. अधिक माहिती साठी आमच्या www.garbhsanskar.co.in या वेबसाईटवर जावे. तसेच  Abhimanyu Garbh Sanskar नावाचे App डाऊनलोड करुन घ्यावे.

गर्भवतींना आत्म निवेदन

गर्भवतींना आत्म निवेदन (Marathi)

गर्भ संस्कार चा अर्थ सर्व प्रथम समजून घ्या.  गर्भ संस्कार ते असतात जे बाळाच्या जगात आगमना नंतर सबंध आयुष्य भर सोबत राहतात. गर्भ संस्कार म्हणजे आईने गर्भस्थ बाळास जीवन जगण्याच्या कलेचे प्रशिक्षण होय, जे आईच्या अंतर्मनातून बाळाच्या अंतर्मनात स्थापित होतात, आणि तेच बाळाच्या जीवनात साकार होत असतात. बाळाचे स्वभाव, चित्त, बुध्दीमत्ता, आनंदमयतेचे प्रमाण, त्याचे सौभाग्य इ. गर्भातच निर्धारित होऊन जातात. गर्भ संस्कार सुसंस्कार व कुसंस्कार दोन्ही स्वरुपात स्थापित होत असतात. हे गर्भस्थ बाळाच्या आईवर अवलंबून असते की नऊ महिण्याचा प्रवास ती कोणत्या प्रकारे निभावून जाते.

            गर्भसंस्काराची प्रक्रिया ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नाही. गर्भ संस्कार मुळात एक मानसिक व अध्यात्मिक प्रक्रिया आहे, ज्या व्दारे बाळाचे भावी जीवन निर्धारित केले जाते. डॉक्टरांची भूमिका त्यांच्या जागी महत्वपूर्ण असतेच परंतू गर्भसंस्काराशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध कमी येतो. आयुर्वेद संबंधित गर्भ संस्काराची प्रकिया जरी वैद्यकिय दृष्टीकोणातून प्रशंसनिय असली तरीही त्याचा प्रत्यक्ष भाग स्वस्थ बाळ व स्वस्थ प्रसुति पर्यंत मर्यादित राहून जातो. अभिमन्यु गर्भ संस्कार या संकल्पनेतुन प्रत्यक्ष गर्भ संस्काराची प्रणाली व प्रशिक्षण दिले जात आहे. या द्वारे स्वस्थ बाळ व स्वस्थ प्रसुति साठी तर लाभ होईलच पण या पलिकडे बाळाचे संपूर्ण आयुष्य निर्धारित करता येईल. हि संकल्पना गर्भवती साठी एक वरदान असल्या सारखे आहे. याची प्रचिती हे पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर आपणास येईलच. अभिमन्यू गर्भ संस्कार शिबिरात पोहंचण्याचे सौभाग्य सर्वांनाच लाभेल असे नाही, मात्र जे शिबीरात पोहंचू शकत नाही त्यांच्या साठी हे पुस्तक व सीडी चे 3 भाग अत्यंत महत्वाचे ठरतील. शिबीराचे प्रत्यक्ष अनुभव हे स्वप्नवत असल्यासारखे व अद्भुत परिणामकारक आहेत याची प्रचिती हजारो साधकांनी आत्ता पर्यंत घेतलेली आहे.

            नऊ महिन्यात काय खावे काय प्यावे, काणते औषध घ्यावे ? बाळाचा विकास कसा होतो ? प्रसुति कशी होते? चेकअप साठी कधी जावे ? वैद्यकिय उपचार काय असतात? योगासने कोणती करावीत? बाळ झाल्यानंतर बाळाचे संगोपण कसे करावे? कोणत्या लसी घ्याव्यात ?  इत्यादि.....इ....या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटत असल्या तरी परंतु गर्भसंस्काराशी अशा बाबींचा प्रत्यक्ष सबंध फार कमी आहे. गर्भसंस्काराच्या अधिंकाश पुस्तकात व प्रशिक्षण सत्रात हेच सर्व असते.  या पुस्तकात अनावश्यक गोष्टी टाळून केवळ गर्भ संस्कार विषयी साहित्य आपणास देत आहोत ज्या व्दारे गर्भसंस्काराची संपूर्ण मूळ प्रक्रिया आपणास प्राप्त होऊन जाईल. मुळात गर्भाधान झाल्यानंतर मूळ गर्भसंस्काराची प्रक्रिया सुरु होत असते जी प्रसुति पर्यंत प्रत्यक्ष पणे चालते. बाळ झाल्यानंतरची प्रक्रिया शिशू संगोपन व बाल संस्काराच्या अंतर्गत येते. या विषयावर स्वतंत्र पुस्तकाचे काम चालू आहे. पण या पुस्तकात केवळ मूळ गर्भसंस्काराचा विषय घेत आहोत. 

            गर्भाधानापुर्वीची तयारी ही सुध्दा फार महत्वाची असून पुस्तकाच्या शेवटच्या भागात याबद्दल बरीच माहिती दिली आहे, जी गर्भधारणा ईच्छुकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. उच्च स्तरीय आत्म्यास गर्भात आमंंत्रण देण्यासाठी व प्राकृतिक व स्वस्थ पणे गर्भ राहण्यासाठी हे महत्वाचे आहे. व पूर्व तयारीने संतान प्राप्ती संबंधित काही दोष किंवा अडचणी असतिल त्याचे सुध्दा निर्मुलन करता येते.

            बाळ गर्भात केवळ स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचे परिणाम नसून, येथे शरीरासोबत दोन आत्म्यांचे मिलन होते जे एक नविन आत्म्यास आमंत्रण देते. त्यानंतर शरीर यंत्रणा आपल्या सारखेच एक घर म्हणजे एक नविन शरीर त्या आत्म्या साठी बनविण्यास प्रारंभ करते . गर्भात केवळ शरीर निर्मिती होत नाही तर त्या गर्भात जाणता जीव असतो. व तो प्रत्येक संस्कार स्वीकारत असतो, पूर्वजन्माच्या गुणांसह नऊ महीन्यांपर्यंत आई वडिलांच्या गुणांना धारण करत असतो. एवढेच नाही तर गर्भात प्रवेश घेतांना हा आत्मा आपल्या गत जन्मातल्या पूर्व संस्कार व सिध्दांताच्या आधारावर आपले धर्म, आई -वडील व कुटुंबाची निवड करत असते.

            जेंव्हा स्त्रीला पहिल्यांदा कळते की, ती गर्भवती आहे तो पर्यंत तीच्या गर्भात एक सजिव चेतना स्थापित झालेली असते. स्त्रीच्या आई होण्यात जणु स्त्री जीवनाची संपुर्णता आहे. तिच्या व्यक्तीमत्वाची चमक व संपूर्ण सौंदर्य जणु ती आई झाल्यानंतरच प्रकट होते. आई होण्यात स्त्री जीवनाची संपुर्ण तृप्ती जाणवते. बाळ नऊ महिन्यांपर्यंत आईच्या श्‍वासाने श्‍वास घेत असतो. आईच्या जीवाशी बाळाचा जीव असतो, गर्भस्थ बाळाचे स्वत:चे संपूर्ण अस्तित्वच आईच्या असण्याने असतो,  बाळ आईच्या डोळ्यांनी जग पाहत असतो, आईच्या कानांनी ऐकत असतो, आईच्या विचारांनी विचार करत असतो, आईच्या भावनेने त्याचे भाव असतात.  दैनिक जीवन शैलीत आपले सर्व कर्तव्य पार पाडत असतांना आई किती वेळ गर्भस्थ बाळाकडे प्रत्यक्ष लक्ष देत असेल ?, परंतु बाळ प्रत्येक क्षण आईशी जुळलेले असते. पहिल्या दिवसा पासून प्रत्येक क्षण ते सचेतनेने गर्भसंस्कार स्वीकारत असते. आई होणे म्हणजे एक अध्यात्मिक प्राप्ती आहे, एक पूर्णत्व आहे मातृत्वाचे. आई होणे ब्रह्मांडातील सर्वोच्च सुख आहे, सर्वोच्च आनंदाचे प्रतिक आहे.

            एक अशा बाळाला जन्म दिला जाऊ शकतो, कि तो संपूर्ण स्वस्थ, दिर्घायु व निर्दोष असेल, सदैव आनंदमय जीवन जगेल, दिव्य गुणांनी युक्त असेल. जो स्वत: सोबत आपल्या कुटुंबाचे - कुळाचे कल्याण करेल. राष्ट्र प्रगती व विश्‍वशांती प्रक्रियेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा सहभाग असेल, तो धर्मनिष्ठ व ईश्‍वरनिष्ठ असेल. कला, साहित्य, संगीत, ध्यान धारणा, प्रेम अशा गुणांनी तो युक्त  होऊ शकेल.  त्याची विद्वत्ता व बुध्दिमत्ता विलक्षण असेल. अत्यंत शांत, दृढ निश्‍चयी, प्रेमळ, सकारात्मक विचारांनी युक्त असेल. असं खूप कांही सांगता येईल अन या सर्व गुणांची स्थापना गर्भातच केली जाऊ शकते व हि प्रक्रिया म्हणजे अभिमन्यु गर्भ संस्कार होय.

            गर्भात जीव स्थापना एक अध्यात्मिक घटना व प्रसव एक नैसर्गिक घटना आहे. प्रसव झाल्या नंतर स्त्री च्या जीवनात खुप काही बदल घडून येतात. काल पर्यंत जी एक मुलगी असते ती आज आई बनते. पण या परिवर्तनाला समजून घेतल्यास या नविन जन्माचे साफल्य मिळते. आई व जन्मास येणार्‍या बाळाचे स्वास्थ्याचे रक्षण करण्यासाठी व त्यात सुसंस्कार स्थापन करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे जरुरी आहे. गर्भावस्था हि स्त्री जीवनाची अशी अवस्था आहे, की ज्या मध्ये विशेष परिस्थितींचा सामना करावा लागु शकतो. आई आणि बाळाचे स्वास्थ्य एकीकडे माता-पित्याची शारीरिक प्रकृती व मानसिक स्थितीवर अवलंबून असते, तसेच खानपान, राहणीमान, आचार विचार व इतर सवयींचा सरळ प्रभाव बाळावर पडतो. या काळात वेळ कसा निघून जाईल हे कळतच नाही.

            जेंव्हा बाळाचे गर्भात आगमन होते तेंव्हा त्याच्या आईचे कर्तव्य आहे कि, त्याला सुसंस्कार द्यावे, त्यासाठी आईने नऊ महिने कसे जगावे याचा विचार व्हायला हवा. नऊ महिने जणु बाळासाठी तपस्याच होय. त्या तपातून जातांना त्यास एवढे सक्षम व्हायचे असते की, जन्मानंतर या जगाच्या रंगमंचावर आपली भूमिका यशस्वी रित्या पार पाडायची असते त्यात भावी माता पित्याची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते. .

            जर पूर्व नियोजन व सकारात्मक गर्भ संस्कार करुन भावी माता पित्यांनी संतान प्राप्ती केली तर कोणतीही शारीरिक व मानसिक उणिव त्या संतान मध्ये राहणार नाही. जागातील सर्वोत्तम संतान  प्राप्तीसाठी गर्भसंस्कार आवश्यक आहे. जसे आपल्या पिढीची सुदृढता आपल्या माता पित्याच्या सुदृढतेवर अवलंबून होती त्याच प्रमाणे येणारी पिढी आपल्यावर अवलंबून असते. गर्भधारणे पूर्वीच त्याची तयारी करावी आणि चुकून पूर्व तयारी केली नसेल तर कमीत कमी नऊ महिन्या पर्यंत आई आणि बाळाचे तन-मन-आत्मा स्वस्थ व प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. नऊ महिण्याच्या आईच्या स्वभावावर त्या बाळाचे संपूर्ण आयुष्यातील स्वभाव निर्धारीत होत असते. केवळ शारीरिक स्वास्थ्याने बाळ सुदृढ तर होईल पण मानसिक व अध्यात्मिक स्वास्थाची काळजी घेतल्यास सयंमशील, सकारात्मक गुणांनी युक्त, संस्कृती प्रिय, सामाजिक मर्यादेची जाण असणारी, स्वधर्माचे स्वाभिमान राखणारी, अशी संतान प्राप्त होईल.

            आई बरोबरच पित्याच्या जीवन शैली व स्भाव शैलीचे प्रभाव सुध्दा गर्भस्थ बाळावर पडतात कारण आई नंतर पिताच बाळाच्या अधिक निकट असतो. घराच्या इतर सदस्यांचे आचार विचार व घरातील वातावरण या बाबींचाही गर्भस्थ बाळा वर काही प्रमाणात प्रभाव पडतच असतो. पण या सर्व प्रभावाचे माध्यम केवळ एकच आहे ती म्हणजे आई ! ती नऊ महिने कसे जगते हेच बाळाच्या दृष्टिकोणातून महत्वाचे आहे.

            पुस्तका शिवाय अभिमन्यु गर्भ संस्काराच्या सध्या 3 सीडीज उपलब्ध असुन प्रथम भागात गर्भस्थ शिशुने ऐकावे असे सर्व मंत्र व स्तोत्र आहेत.  व्दितिय भागात अत्यंत महत्वाचे असे गर्भ संवादा अंतर्गत गर्भस्थ शिशुस विविध प्रशिक्षण देणारे 3 शिशु संवाद व एक गर्भवतीच्या जीवनास आवश्यक चालना देणारी व आचार विचारांमध्ये सुयोग्य संतुलन राखणारी गर्भवती अंतर्मनाची प्रार्थना आहे. तृतिय भागात गर्भवती रिलॅक्सेशन, षटचक्र ध्यान इ.  महत्वाचे सेशन आहेत.

            या शिवाय गुगल प्ले स्टोर मधुन अभिमन्यु गर्भ संस्कार चे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यास त्या काहि महत्वाचे ऑडिओ टॅ्रक, गर्भ संस्कार विषयी महत्वाची माहिती, गर्भवती दैनंदिनी इ. बरेच काहि प्राप्त होईल.

            आता शिबीरा विषयी थोडेसे, अभिमन्यु गर्भ संस्कार शिबीर म्हणजे गर्भवती साठी एक वरदान असल्या प्रमाणे आहे. याचा अनुभव हजारो लोकांनी घेतला आहे व घेत आहेत. वेब साईट वर व अ‍ॅप वर आपण हजारो लोकांचे अभिप्राय वाचु शकता. या शिबीरात एकटी गर्भस्थ आई सुध्दा सहभाग घेऊ शकते पण आई वडील दोघांनी सहभाग घेतल्यास अधिक सुंदर अनुभव येऊ शकतिल व ता आमचा आग्रह ही असतो व उत्तम प्रतिसाद सुध्दा आहे.   शिबीरामध्ये ध्यान, प्राणायाम, ऐच्छिक सामान्य व्यायाम या प्राथमिक प्रशिक्षणा सह अत्यंत महत्वाचे असे, प्रत्यक्ष सहभाग असलेले नऊ प्रकारचे संस्कार त्यात मातृ-पितृ संस्कार, षटचक्र संस्कार, समृध्दि संस्कार, मंगलम् संस्कार, कला सृजन संस्कार, अन्न संस्कार, धर्म संस्कार, विद्या संस्कार, पंचतत्व संस्कार घेतले जातात. या शिवाय शिशू संवाद, शिशु ध्यान चे प्रशिक्षण असते. तसेच सामान्य प्रसुती, अनुवांशिक रोगांपासून शिशूस संरक्षण, तनाव व भयमुक्ति इ. विषयांवर मार्गदर्शन असते.  शिबीराच्या शेवटच्या 45 मिनटाच्या सत्रात मातृत्व उत्सव, व नंद उत्सवाचा सहभाग असतो. शिबीरात बाळाची संपुर्ण जीवन शैली व स्वभाव शैली निश्‍चित केली जाते, शिबीरात सहभाग घेणारे माझे बाळ कसे होईल या भावनेने न जाता कसे आहे या विश्‍वासाने भरुन जातात.

             प्रथम महिन्या पासून नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होईपर्यंत सर्व गर्भवतीं साठी शिबीर समान उपयुक्त आहे.  दोन दिवस खुर्चीवर बसुन, खाली बसुन, झोपुन अशा सर्व स्टेप मध्ये साधना होतात, दिवस भरात एक तासाचे लंच ब्रेक व 10 मिनटाचे दोन टि ब्रेक असतात. 45 मिनटांचे एकुण 4 सत्र असे दोन दिवसात एकुण 8 सत्र होतात. शक्यतो वातानुकुलित बँक्वेट हॉल मध्येच शिबीर घेतले जातात. घरी जेवढे रिलॅक्स वाटु शकते त्यापेक्षा कईक पटिने जास्त रिलॅक्स या दोन दिवसात सर्व होऊन जातात. व हा उत्साह व सहजता पुर्ण गर्भास्थेत टिकवण्यासारखा असतो.

            अभिमन्यु गर्भ संस्कार शिबीर खास गर्भवतींसाठी आहेच, परंतू गर्भधारणे पूर्र्वी सुध्दा शिबीर करता येईल. त्यामुळे गर्भधारणा सहजपणे होते व काहि अडचणी असल्यास दूर होतात एक संस्कार युक्त बाळच गर्भात प्रवेशित होतो.

            विशेषत: अभिमन्यू गर्भ संस्कार च्या या संपूर्ण संकल्पने व्दारे आपणास  स्वस्थ, सुदृढ, सौभाग्यशाली, धनवान, विद्वान, निर्दोष, आनंदमय, दिर्घायु, निर्भय व दिव्य संतान प्राप्ती होईल हे सुनिश्‍चित आहे. सर्व भावी मातापित्यांचेया दिव्य संकल्पनेत हार्दिक स्वागत, अभिनंदन व मनस्वी शुभेच्छा !

            सर्व मंगलम भवतु । शुभं भवतु ॥

            जय श्री कृष्ण ।

                                    -  मनोज बुब